शिरूर संवाद
newspaper ई-पेपर
search

भूमिपुत्र प्रतिष्ठानच्या स्पर्धा कौतुकास्पद; उत्कृष्ट आयोजनामुळे स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...

A

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

WhatsApp शेअर Facebook X (Twitter)
भूमिपुत्र प्रतिष्ठानच्या स्पर्धा कौतुकास्पद; उत्कृष्ट आयोजनामुळे स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...
“

उद्योजक प्रकाश धारिवाल यांचे गौरवोद्गार; 'गणराया करंडक २०२६' पुरस्काराने विजेत्यांचा सन्मान

शिरूर :

गणेशोत्सव आणि गौरीपूजन हे समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारे सण आहेत. या उत्सवांच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरा जपण्याबरोबरच नागरिकांमधील उत्साह आणि कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे काम भूमिपुत्र प्रतिष्ठान करत आहे. प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्वार शिरूरचे माजी नगराध्यक्ष तथा उद्योजक प्रकाश धारिवाल यांनी काढले.

गणेशोत्सवानिमित्त भूमिपुत्र प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित घरगुती गौरी-गणपती सजावट व 'सेल्फी विथ बाप्पा' स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. विजेत्यांना प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते 'गणराया करंडक २०२६' देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला शिरूर नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे, पुणे विभागीय कार्यालयाचे सहआयुक्त संजीव पलांडे, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.

स्पर्धेतील विजेत्यांना 'गणराया करंडक २०२६' सोबतच बक्षीस म्हणून 'सकाळ'चा 'नांदी' दिवाळी विशेषांक भेट देण्यात आला. तसेच पारितोषिक वितरण समारंभासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनाही हा दिवाळी अंक भेट देण्यात आला. 'नांदी' दिवाळी विशेषांकाच्या दर्जेदार साहित्याचे उपस्थित मान्यवरांनी उत्स्फूर्त कौतुक केले.


भूमिपुत्र प्रतिष्ठानच्या वतीने शिरूरमध्ये अध्यक्ष सुशांतभाऊ कुटे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन करण्यात येते. या स्पर्धांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, प्रतिष्ठानच्या माध्यमातून सांस्कृतिक उपक्रम अतिशय सुंदर पद्धतीने राबविले जात असल्याचे युवा उद्योजक आदित्यजी धारिवाल यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा देताना सांगितले की सुशांतभाऊ कुटे व भूमिपुत्र प्रतिष्ठानचे नियोजन, आयोजन आणि समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याची धडपड कौतुकास्पद असून, भविष्यातही अशाच चांगल्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना शुभेच्छा असल्याचे त्यांनी व्यक्त केले.गौरी सजावट स्पर्धा


प्रथम - मधुरा अर्जुन कराळे

द्वितीय - रीना निलेश मैड

तृतीय - संगीता शशिकांत कुलकर्णी

चतुर्थ - आकांक्षा अनिल वळे




गणपती सजावट स्पर्धा

प्रथम - कानिफनाथ शिवशंकर परदेशी

द्वितीय - सुषमा स्वप्रिल पडदुने

तृतीय - आर्या जामदार

चतुर्थ - ऋतिक अशोक जाधव




'सेल्फी विथ बाप्पा' स्पर्धा

प्रथम - इशांक विशाल भावटनकर

द्वितीय - विश्वराज लव्हा चांदगुडे

तृतीय - जान्हवी संजय डांगे

चतुर्थ - रोहित संदीप लगड

A

Avinash Ghogare

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या